खाद्यतेलाच्या दरात झाली मोठी घसरण पहा 15 लिटर तेलाचे नवीन दर

नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या दरात डब्यामागे पंचवीस ते पन्नास रुपयांनी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे साखरेचे दरही क्विंटलमागे पन्नास रुपयांनी कमी झाले.मात्र, आवक कमी असल्यामुळे हिरव्या वाटाण्याचे दर क्विंटलमागे एक हजार ते पंधराशे रुपयांनी तर हराभराडाळीचे दर २०० रुपयांनी वाढले.

 

हे सुद्धा वाचा:- घरकुल योजनेत झाली 50 हजार रुपयांची मोठी वाढ खात्यात होणार इतके रुपये जमा

तुटवड्यामुळे गोटा खोबरे दरात दहा किलोमागे आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. तर खोबरेल तेल १५ किलोच्या डब्यामागे आणखी पाचशे रुपयांनी तर सर्व प्रकारच्या पोह्यांचे दरही क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले.सोयाबीन तेलाच्या दरात ५० डॉलर्सनी तर सूर्यफूल तेलाच्या दरात २५ डॉलर्सची घसरण झाली. यामुळे वायदे बाजारात खाद्यतेलांच्या दरात मोठी घसरण झाली. येथील बाजारात मागणी कमी आहे. मात्र, आगामी काळात दर आणखी घसरतील या शक्यतेमुळे विक्रीचा दबाव वाढल्यामुळे गेल्या आठवड्यात सोयाबीन, पाम तेलाच्या दरात १५ किलोच्या डब्यामागे पन्नास रुपयांनी घट झाली.

हे सुद्धा वाचा:- घरकुल योजनेत झाली 50 हजार रुपयांची मोठी वाढ खात्यात होणार इतके रुपये जमा

 

सूर्यफूल तेलही पंचवीस रुपयांनी उतरले. शेंगदाणा तेल आणि सरकी तेलाचे दर स्थिर होते. मात्र स्टेरिनची आयात कमी प्रमाणात होत असल्यामुळे वनस्पती तुपाच्या दरात डब्यामागे पंचवीस रुपयांनी वाढ झाली. तर तुटवड्यामुळे खोबरेल तेलाच्या दरात डब्यामागे पाचशे रुपयांनी वाढ झाली. १५ किलोच्या डब्याचा दर ४५०० रुपयांवर पोहोचला असून हा दर विक्रमी मानण्यात येत आहे.

Leave a Comment