आनंदाची बातमी! राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील 15 दिवस पाच ब्रास वाळू मोफत मिळणार

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावणारी विजेची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले

 

.शेतकऱ्यांना दिवसाही वीजपुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली आहे. या योजनेतून १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम सुरू झाले असून, आतापर्यंत ४ हजार मेगावॅट वीज निर्मिती पूर्ण झाली आहे, असे फडणवीस म्हणाले. २०२६ च्या अखेरीस शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्यासह राज्यात १२ महिने वीज उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम यावर्षी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प मानला जातो. तसेच, तापी मेगा रिचार्ज या जगातील आश्चर्यकारक प्रकल्पाचे कामही हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाद्वारे समुद्राला वाहून जाणारे सुमारे ३५ टीएमसी पाणी आणले जाईल. बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.राज्यातील कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ५ हजार गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली आणि त्यातून सकारात्मक बदल दिसून आल्याने जागतिक बँकेने पुन्हा सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

 

हे सुद्धा वाचा:-  सोने झाले 48 हजार रुपयांनी स्वस्त येथे क्लिक करून बघा ताजे नवीन दर 

आता त्यांच्या सहकार्याने राज्यातील सुमारे ७ हजार ५०० गावांमध्ये एकात्मिक पद्धतीने काम करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा:-  सोने झाले 48 हजार रुपयांनी स्वस्त येथे क्लिक करून बघा ताजे नवीन दर 

 

शेतीसाठी शेतमजुरांची कमतरता ही एक मोठी समस्या आहे, असे मत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शेतीचे यांत्रिकीकरण करणे आवश्यक आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडण्यासाठी केंद्र सरकारने विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment