कर्मचाऱ्यांच्या खात्यात महिन्याला ३ हजार रुपये जमा होणार तुम्ही केला का अर्ज येथे जाणून घ्या March 29, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी खास योजना राबवली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी श्रमयोगी योजना राबवली आहे . या योजनेत कामगारांना आर्थिक मदत केली जाते.संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएफ खात्यात दर महिन्याला पेन्शन मिळते. येथे क्लिक करून बघा ई-श्रम कार्ड कसं बनवायचं? तसेच त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनदेखील मिळते. परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला पेन्शन मिळावी, यासाठी ई-श्रम योजना राबवण्यात आली आहे.श्रमयोगी योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला ३००० रुपये मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल कार्डदेखील दिले जाते. ई-श्रम कार्ड असल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे.संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन (Pension) मिळते. परंतु असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी अशी कोणतीही सोय नसते. त्यामुळे ही योजना राबवली आहे. या योजनेत ३००० रुपयांची पेन्शन मिळते. ई-श्रम योजनेअंतर्गत नागरिकांना विमा कव्हरदेखील मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १६ ते ५९ वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. येथे क्लिक करून बघा ई-श्रम कार्ड कसं बनवायचं?