नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केली होती. तासिका किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गीग वर्कर्ससाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा
याचा फायदा सुमारे १ कोटी कामगारांना होणार आहे. गीग कामगारांच्या श्रेणीमध्ये सेल्समन/हेल्पर, ऑटो चालक, ड्रायव्हर, पंक्चर दुरुस्ती करणारे, मेंढपाळ, दुग्ध उत्पादक शेतकरी, सर्व पशुपालक, पेपर विक्रेते, डिलिव्हरी बॉय, वीटभट्ट्यांवर काम करणारे मजूर इत्यादींचा समावेश आहे. याची नोंदणी कशी करायची? आणि त्याचा काय फायदा होणार? याची माहिती घेऊ.केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार नोंदणीकृत आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गीग कामगारांना अनेक फायदे मिळतात. नोंदणी असलेल्या कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला २ लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्ही अपघातात अपंग झालात तर तुम्हाला १ लाखांपर्यंत मदत मिळते. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे करता येते
येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा