शेतकऱ्यांनो तुम्हाला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळाले का अशा प्रकारे तपासा February 28, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सन २०२३ या खरीप हंगामात भाव पडल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाने ५ हजार रुपये प्रतिहेक्टर कमाल २ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले होतेसदर योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ४ हजार ७४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. येथे क्लिक करून बघा कशी करावी पोर्टलवर करावी खातरजमा त्यांची माहितीसुद्धा ऑनलाइन अपलोड करण्यात आली; परंतु २ हजार ६०४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने ह्या शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगाम २०२३ मध्ये ई-पीक पाहणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरी, तसेच खरीप २०२३ मध्ये ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद केली नाही तथापि ज्यांच्या खरीप २०२३ च्या ७/१२ उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे वैयक्तिक सामाईक व खातेदार हेक्टरी पाच हजार रुपयांच्या अर्थसाहाय्यास पात्र ठरले होते. २ कोटी ४५ लाख ९६ हजार १२३ रुपयांचे अर्थसाहाय्य कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरीत केली जाणार आहे; परंतु ई-केवायसी पेंडिंग आहे येथे क्लिक करून बघा कशी करावी पोर्टलवर करावी खातरजमा