नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी ४ जूनपासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते.शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी (इंटिमेशन) नुसार जिल्ह्यातील दोन लाख ११ हजार ६६३ शेतकऱ्यांना २८२ कोटी १९ लाख रुपये पीक विमा कंपनी देणार आहे.प्रत्यक्षात पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले

व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 50 हजार रुपये येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा
.शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे व शासन हिस्सा जमा करण्यासाठी कालावधी ठरला आहे, मात्र विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देताना कंपनीच्या सोईने दिली जाते.शासनाकडून विमा कंपनीला जमा होणाऱ्या रकमेपैकी किती टक्के रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जाते?, याचा तर हिशोब न विचारलेला बरा. कारण, पीक विमा कंपनीच्या सोईने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. यंदाही असेच झाले आहे.पुढील खरीप हंगाम दोन अडीच महिन्यांवर आला असला, तरी मागील खरीप हंगामाची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही
व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 50 हजार रुपये येथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा
. आता पुढील आठवड्यात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे सांगितले जात असले, तरी रक्कम जमा झाल्याशिवाय खरे नाही.स्थानिक नैसर्गिक आपत्ती (पीक उभा असताना नुकसान) व पोस्ट हार्वेस्टिंग (पीक काढून ठेवल्यानंतर नुकसान) झाल्याच्या तक्रारीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम मिळणार असून, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, माढा व मंगळवेढ्याला घसघशीत रक्कम मिळणार आहे. पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्याला इतर तालुक्याच्या तुलनेत फारच कमी रक्कम मिळणार आहे.