शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! सरकारने दिली मोठी खुशखबर या शेतकऱ्यांसाठी पिक विमा केला मंजूर

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून, फळ पीक विमा योजनेसाठी रखडलेला निधी अखेर वितरित केला जाणार आहे. राज्य सरकारने मृगबहार आणि आंबिया बहार 2023-24 आणि 2025 या चारही हंगामांसाठी प्रलंबित तसेच आगाऊ देय असलेला विमा हप्ता विमा कंपन्यांना देण्यास मंजुरी दिली आहे.Crop Insurance 2025

 

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या दिवशी खात्यात 2100 रुपये जमा होणार

यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षेत असलेली विमा रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता, मात्र निधीअभावी विमा कंपन्यांनी हप्ता वाटप थांबवले होते. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. 2023-24 या हंगामात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते. मृगबहार हंगामात दुष्काळामुळे शेती प्रभावित झाली, तर आंबिया बहार हंगामात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले.Crop Insurance 2025

हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या दिवशी खात्यात 2100 रुपये जमा होणार

 

अशा परिस्थितीत रखडलेल्या विमा निधीच्या वितरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.आंबिया बहार 2024-25: 159 कोटी रुपये (आगाऊ रक्कम)मृगबहार 2024-25: 26 कोटी रुपयेआंबिया बहार 2023-24: 10 कोटी रुपयेमृगबहार 2023-24: सुमारे 6-7 लाख रुपयेया निधीच्या वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे लांबणीवर पडलेला विमा मिळण्यास गती येईल.राज्य सरकारने अधिकृत आदेश निर्गमित करत विमा कंपन्यांना हा निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला होता, परंतु निधीअभावी त्यांना लाभ मिळू शकला नव्हता, त्यांना आता ही रक्कम मिळणार आहे. यापूर्वी वारंवार निधी वितरणाच्या प्रक्रियेत अडथळे येत होते, मात्र आता हा प्रश्न सुटणार आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित विमा रक्कम वेळेत मिळेल आणि शेतीसाठी आवश्यक आर्थिक आधार मिळणार आहे. त्यामुळे विमा योजनेतील ही सुधारणा शेतकऱ्यांसाठी मोठी मदत ठरणार आहे.

Leave a Comment