१ लाख रुपयांचं लोन घेण्यासाठी किती CIBIL स्कोअर लागतो? येथे जाणून घ्या

Cibil Score Loan 2025 नमस्कार मित्रांनो अचानक पैशाची गरज भासली आणि जवळ पर्याय नसेल, तर पर्सनल लोन हा एक महत्त्वाचा मार्ग ठरतो. पण पर्सनल लोन मिळवताना बँका सर्वात आधी तपासतात तो म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर.१ लाख रुपयांचं पर्सनल लोन घेण्यासाठी साधारणतः किमान ७५० किंवा त्याहून अधिक CIBIL स्कोअर असावा लागतो

 

. मात्र, काही खास बाबतीत कमी स्कोअरवरही लोन मिळू शकतं, फक्त त्यासाठी काही अटी लागू होतात.जर तुमचा CIBIL स्कोअर ७५० पेक्षा कमी असेल, तरही काही पर्याय आहेत. उदाहरणार्थ, सिक्योर्ड पर्सनल लोन (Personal Loan) म्हणजे एखादी मालमत्ता किंवा एफडी गहाण ठेवून घेतलेलं कर्ज. यात बँकेला परतफेडीची खात्री असते. दुसरं म्हणजे, एफडीवरून मिळणारं क्रेडिट कार्ड किंवा लोन, जे कमी स्कोअर असतानाही दिलं जातं. शिवाय, तुमच्या आर्थिक स्थितीची माहिती — जसे की सॅलरी स्लिप, ITR — दिल्यास बँक विश्वास ठेऊ शकते.

हे सुद्धा वाचा:  या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मे महिन्याच्या हफ्ता बघा आपले नाव आहे का 

 

CIBIL स्कोअर ३०० ते ९०० या दरम्यान असतो. ७५० पेक्षा अधिक स्कोअर ‘चांगला’ मानला जातो. पण काही सवयींमुळे स्कोअर कमी होऊ शकतो:

EMI चुकवणे – कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर न भरल्यास.

अनेक बँकांना अर्ज करणे – वारंवार कर्जासाठी अर्ज केल्यास हार्ड इन्क्वायरीमुळे स्कोअर घसरतो.

क्रेडिट कार्डचा जास्त वापर – लिमिट जवळपास वापरणं स्कोअर कमी करतं.

वारंवार कार्डसाठी अर्ज करणं – वारंवार अर्ज केल्यामुळे नकार मिळाल्यास स्कोअरवर परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा:  या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मे महिन्याच्या हफ्ता बघा आपले नाव आहे का 

 

क्रेडिट कार्ड बंद करणं – एकूण क्रेडिट लिमिट कमी होते, युटिलायझेशन वाढतं.

वेळेपूर्वी कर्ज बंद करणं – काही वेळेस हे तात्पुरती घसरण निर्माण करतं.

क्रेडिट इतिहास नव्हता/अल्प आहे – जेव्हा पुरेसा क्रेडिट इतिहास नसतो, तेव्हा स्कोअर बनत नाही.

जर तुमचा CIBIL स्कोअर कमी असेल, तर काही उपाय करून लोन मिळवणं शक्य आहे. उदाहरणार्थ, सिक्योर्ड लोन, को-सिग्नर किंवा गॅरंटरच्या मदतीने लोन, किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून (NBFC) लोन घेण्याचा पर्याय निवडता येतो. काही NBFCs ६५० च्या आसपास स्कोअर असतानाही लोन देतात, पण व्याजदर थोडा जास्त असतो.

Leave a Comment