Career After 12th नमस्कार मित्रांनो बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवलं आहे. बारावी हे करिअरला कलाटणी देणारे वर्ष असते. बारावीनंतरच पुढे काय करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवतात.तुम्हाला पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय, तुमचे स्वप्न काय यावरुन तुम्हाला करिअर निवडायचे आहे. दहावीनंतर सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स शाखेतून अभ्यास केला तर त्यानंतर तिन्ही शाखांमध्ये वेगवेगळे करिअर ऑप्शन आहे.बारावी झाल्यानंतर तुम्ही कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेत पुढे तीन वर्षांचे पदवी शिक्षण घेऊ शकतात. याचसोबत तुम्ही दुसरा कोणताही कोर्स करु शकतात. डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स असे अनेक ऑप्शन तुमच्यासमोर आहे.
हे सुद्धा वाचा:- पॅन कार्ड वरून मिळणार तुम्हाला आता तात्काळ कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
वाणिज्य (Career In Commerce)
जर तुम्ही वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर तुम्ही सी.ए (CA) , बी.कॉम (B.com), सी.एस. फाउंडेशन (CS Foundation), बी.सीए (BCA), बी. आर्किटेक्ट (B.Arch) डी.एड पदवी (D.Ed) प्राप्त करु शकतात. याचसोबत तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मास्टर्स, एमबीए, एल.एल.बी. बी.एड, एम.एड पदवी प्राप्त करु शकतात. जर तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर बी.एड आणि एम.एड पदवी प्राप्त करावी.
कला (Career In Arts)
कला शाखेतून जर तुम्ही बारावीची परीक्षा दिली असेल तर त्यानंतर तुम्ही डी.एड, एलएलबी, फॅशन डिझाइनिंग डिप्लोमा, इंटेरियर डिझाइनिंग डिप्लोमा, बी.ए, बी.बी.ए, एम.बी.ए पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच तुम्ही फॉरेन लँग्वेज डिप्लोमा करु शकतात. याचसोबत तुम्ही पुढे मास्टर्स करु शकतात. तुमच्याकडे मास्टर्स ऑफ मास कम्युनिकेशन करणे हा एक ऑप्शन आहे.
हे सुद्धा वाचा:- पॅन कार्ड वरून मिळणार तुम्हाला आता तात्काळ कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
विज्ञान (Career In Science)
जर तुम्ही विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली असेल तर पुढे ग्रॅज्युएशन, मास्टर्स, आयटी (IT) अशा अनेक विषयात पदवी प्राप्त करु शकतात. तुम्ही एन.डी.ए (NDA) परीक्षा देऊन आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्समध्ये (Air Force) काम करु शकतात. यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ प्लानिंग अँड डिझाइनमध्ये डिग्री प्राप्त करु शकतात. यानंतर तुम्ही बी.टेक करुन पुढे एमबीएदेखील करु शकतात. तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जाईन एम.एस (MS) . करु शकतात. याचसोबत तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटदेखील करु शकतात. याचसोबत तुम्ही एमसीएम, एमसीएम पदवीदेखील प्राप्त करु शकतात.