कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI येथे जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो घरात राहणं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं पण असे अनेक लोक असतात जे भाड्याच्या घरात राहतात. घर खरेदीबद्दल बोलायचं झालं तर आज सामान्य माणसाला घर खरेदी करणं खूप कठीण झालंय. best home loan EMI

 

घर विकत घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते, ही खूप मोठी रक्कम आहे.अशा तऱ्हेनं अनेकजण बँकेकडून गृहकर्ज घेऊन घर खरेदी करतात.देशातील विविध बँकांकडून ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरानं गृहकर्ज दिलं जात आहे.

हे सुद्धा वाचा:केंद्र सरकारची मोठी घोषणा.! आता प्रत्येकाला मिळणार 50 हजार रुपये आणि मोफत वीज

 

अशा परिस्थितीत जर तुम्ही गृहकर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा बँकेची निवड करावी ज्याचे गृहकर्जाचे व्याजदर कमी आहेत. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय आणि देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जाबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया कोणती बँक कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे.एसबीआयच्या गृहकर्जाबद्दल बोलायचं झालं तर एसबीआय आपल्या ग्राहकांना ८ टक्के प्रारंभिक व्याजदरानं गृहकर्ज देतं. सिबिल स्कोअरनुसार या व्याजदरामध्ये बदल होऊ शकतो. जर तुम्हाला एसबीआयकडून २० वर्षांच्या कालावधीसाठी ८ टक्के व्याजदरानं २५ लाख रुपयांचं गृहकर्ज मिळालं तर तुम्हाला दरमहा २०,९११ रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही एकूण ५०,१८,६४० रुपये बँकेला भराल

हे सुद्धा वाचा:केंद्र सरकारची मोठी घोषणा.! आता प्रत्येकाला मिळणार 50 हजार रुपये आणि मोफत वीज

 

. यामध्ये २५ लाख १८ हजार ६४० रुपये तुमच्या व्याजाच्या रुपात बँकेला द्याल,एचडीएफसी बँकेच्या गृहकर्जाबद्दल बोलायचं झालं तर एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना ८.४५ टक्के सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज देते. हे व्याजदर आपल्या सिबिल स्कोअर आणि कर्जाच्या रकमेनुसार बदलू शकतात. जर तुम्हाला या बँकेकडून २० वर्षांच्या कालावधीसाठी ८.४५ टक्के व्याजदरानं २५ लाख रुपयांचे गृहकर्ज मिळालं तर तुम्हाला दरमहा २१,६१७ रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही एकूण ५१,८७,९६८ रुपये बँकेला भराल. यामध्ये २६,८७,९६८ रुपये तुम्ही व्याजाच्या स्वरुपात बँकेला द्याल.

Leave a Comment