राज्य सरकारचा मोठा निर्णय.! या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 20000 रुपये जमा होणार लगेच यादी तपासा

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. सरकारने प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून,

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1,800 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात याबाबत अधिकृत घोषणा केली.या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये कर्ज असा करा अर्ज

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत वित्त विभागाच्या चर्चेदरम्यान धान उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्यात येईल, अशी घोषणा केली होती.धान शेती मुख्यतः पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे. राज्य सरकार लवकरच अर्थसहाय्य वाटपाची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये कर्ज असा करा अर्ज

 

.राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सातत्याने विविध योजना राबवण्यात येत आहेत. या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल आणि त्यांची शेती अधिक फायदेशीर होईल. धान खरेदीत सुधारणा आणि बोनस देण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a Comment