Agriculture subsidy loan मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Abhiyan) योजनेंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फाॅडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता ५० टक्के अनुदान देण्यात येते.

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा
प्रकल्पाकरीता १० टक्के स्व: हिस्सा तर उर्वरित ४० टक्के बँकेकडून (Agri Business Subsidy) कर्ज उपलब्ध करून दिले जाते.योजनेला लाभ शेतकरी व्यक्तिगत, शेतकरी गट किंवा स्वयंसाहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, स्टार्टअप ग्रुप आदींना घेता येतो. शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या पशुपालन (Animal farming) व वैरण निर्मिती या कल्याणकारी योजनेद्वारे स्वत:च्या उत्पन्न वाढीबरोबर अंडी, मांस, दूध, लोकर आदी व्यवसायांतून इतरांसाठी रोजगार निर्मिती होऊन गावाचा विकास साधला जाऊ शकतो.
येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा