नमस्कार मित्रांनो शेतीचा आकार दिवसेंदिवस कमी होत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी अल्पभूधारक बनले आहेत. 75 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, त्यामुळे पारंपरिक शेतीत अडथळे निर्माण होत आहेत.

अशा परिस्थितीत गट शेती (समूह शेती) ही शाश्वत पर्याय ठरू शकते.गट शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढेल, तंटे कमी होतील आणि यांत्रिक शेती अधिक सुलभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात लवकरच गट शेतीसाठी नवीन धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
हे सुध्दा वाचा:- बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देणार आहे 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज
बालेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे रविवारी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2024’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी विविध कृषी गटांचा सन्मान केला आणि शेतकऱ्यांना सरकारच्या नवीन योजनांबाबत मार्गदर्शन केले.मागील काही दशकांत शेतजमिनींचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे एक ते दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे कठीण झाले आहे.गट शेतीमध्ये शेतकरी एकत्र येऊन शेती करतात, त्यामुळे पुढील फायदे होतात:एकत्रित जमिनीमुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य – छोटे शेतकरी एकत्र आल्याने मोठ्या क्षेत्रावर पीक घेता येते.यांत्रिक शेतीस मदत – ट्रॅक्टर, हार्वेस्टर यांसारखी महागडी यंत्रे शेतीसाठी वापरणे शक्य होते.
हे सुध्दा वाचा:- बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देणार आहे 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज
तंत्रज्ञानाचा वापर वाढतो – ठिबक सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान, मृदायोजना अशा अत्याधुनिक गोष्टी गट शेतीमध्ये शक्य होतात.तंटे आणि स्पर्धा कमी होते – शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढतो, आर्थिक फायदाही अधिक मिळतो.सरकारी मदतीचा अधिक फायदा – गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, कर्ज सुलभतेने मिळू शकते.दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गट शेती हा प्रभावी उपाय ठरू शकतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार असून, आधुनिक तंत्रज्ञान, सामूहिक संसाधनांचा उपयोग आणि सरकारच्या मदतीमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम आणि शाश्वत होऊ शकते. गट शेतीला प्रोत्साहन देणारे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.