शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई झाली जमा यादीत आपले नाव बघा

नमस्कार मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 5 लाख 39 हजार शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आली आहे. राज्यात अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना सरकारने वेळोवेळी मदत जाहीर केली होती.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार पाच लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

 

सन 2022 ते 2024 या कालावधीतील राज्यातील 5 लाख 39 हजार 605 लाभार्थ्यांना 592 कोटी 34 लाख 90 हजार 530 रुपयांची मदत वर्ग करण्यात आली आहे, त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे.आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी, पूर सन 2022, सन 2023, सन 2024, अवेळी पाऊस 2022-2023, व 2023-2024, अवेळी पाऊस, अतिवृष्टी 2023-2024, दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार पाच लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

 

.नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळणार आहे. पुणे विभागात 27 हजार 379 लाभार्थींच्या बँक खात्यावर 40 कोटी 72 लाख 53 हजार 13 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1 हजार 787 लाभार्थ्यांना 1 कोटी 77 लाख 44 हजार 279 रुपये तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 64 लाभार्थ्यांना 99 लाख 62 हजार 37 रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.दरम्यान, 2022 ते 2024 या कालावधीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पूर, अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळाचा सामना करावा लागला होता. या कालावधीत शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करण्यात आला होता. परंतु निधीच्या कमतरतेअभावी निधी मिळाला नव्हता. गेल्या तीन वर्षापासून नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना अखेर मदत मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment