लग्नानंतर आधारकार्ड वर नाव बदलायचं आहे येथे जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया April 24, 2025 by Liveyojana Aadhar Update After Marriageनमस्कार मित्रांनो प्रत्येक भारतीय नागरिकाला आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्ताऐवज झाले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते शासकीय योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड गरजेचं आहे. त्यामुळे आधार कार्डमधील माहिती अचूक आणि अपडेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. येथे क्लिक करून बघा संपूर्ण प्रकिया आयुष्यात अनेक वेळा अशी वेळ येते जेव्हा आपल्या ओळखीत काही बदल होतात, जसं की महिलांचं लग्न झाल्यावर तिचं आडनाव बदलत असतं. तुमचं नुकतंच लग्न झालं असेल आणि तुम्हाला तुमचं आधार कार्डमधील आडनाव बदलायचं असेल, तर यासाठी कोणते दस्ताऐवज लागतात आणि आडनाव बदलण्याची प्रक्रिया काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.लग्नानंतर आडनावात बदल केला असेल, तर तो आधार कार्डमध्येही अपडेट करणं आवश्यक ठरतं. यामुळे तुमच्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांमध्ये, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खाते यात एकसंधता राखली जाते. यामुळे भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये अडचण येत नाही. आडनाव अपडेट नसलं, तर अनेक वेळा महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. येथे क्लिक करून बघा संपूर्ण प्रकिया