तरुणांसाठी मोठी खुशखबर.! राज्यात होणार फेब्रुवारी नंतर 10 हजार पोलीस पदांसाठी मोठी बंपर भरती

नमस्कार मित्रांनो राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब, या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत.त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व ग्रामीणच्या पोलिस प्रमुखांकडून डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे.

 

हे सुद्धा वाचा:- तुमच्या मुलीचे लग्न करण्यासाठी सरकार देणार आता इतके अनुदान असा करावा लागणार अर्ज

दरवर्षी सरासरी १० ते १५ टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ होते, पण मा गील काही वर्षांत हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पोलिस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली तपासली जात आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे. या पोलिस भरतीचा मैदानाची टप्पा साधारणत:

हे सुद्धा वाचा:- तुमच्या मुलीचे लग्न करण्यासाठी सरकार देणार आता इतके अनुदान असा करावा लागणार अर्ज

 

पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन सुरु आहेआठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते, असेही वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मागीलवेळी १७ हजार पोलिस पदांसाठी राज्यभरातून तब्बल १८ लाखांपर्यंत अर्ज आले होते. यावेळीदेखील अर्जांची स्थिती अशीच राहील, असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे.डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल. त्यानुसार काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल.

Leave a Comment