शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! पीएम किसान योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात होणार आता इतके रुपये जमा लवकर यादी बघा January 24, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार असून , या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे. गेल्या अर्थसंकल्पातही सरकारनं शेतीला 9 प्राधान्यक्रमात अग्रस्थानी ठेवले होते . हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना होणार फार्मर आयडी कार्ड वाटप अशा प्रकारे करा अर्ज त्याचबरोबर शेतकरी आंदोलनामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घोषणेत सरकार किसान सन्मान निधीच्या हप्त्यात (Kisan Samman Nidhi) वाढवेल , असा अंदाज आहे. तर चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.फेब्रुवारी 2025 अर्थसंकल्पात (Budget 2025) सरकार किसान सन्मान निधीच्या (PM-KISAN) हप्त्यात वाढ करू शकते. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना होणार फार्मर आयडी कार्ड वाटप अशा प्रकारे करा अर्ज आतापर्यंत किसान सन्मान निधी योजनेमार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळत होते. आता ही रक्कम 8000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे . संसदेच्या कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीने 17 डिसेंबर रोजी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात ती वाढवून 12 हजार रुपये करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आताच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो .