रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुुर आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही onlineregister.org.या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.साउथ सेंट्रल रेल्वेकडून ही भरती जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये कंडिशनिंग, कारपेंटर, डीझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, वेल्डक या पदांसाठी भरती जाहीर करण्या आली आबे. ४२३२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली आहेरेल्वेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.या नोकरीबाबत सविस्तर महिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वयोगटातील असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.