मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचाहप्ता 2100 रुपये होणार आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार असल्याचे देखील राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.