लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी .! या लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही? यादीत आपले नाव बघा

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता 26 जानेवारीनंतर दिला जाणार असला तरी 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे, कारण महिला व बालविकास विभागाकडून राज्य सरकारकडे अस प्रस्तावच गेला नसल्याची माहिती समोर येत आहे.

 

हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मोदी सरकार देणार 6 हजार रुपये असा करा अर्ज

याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीआधी महायुतीने केलेल्या घोषणेप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं विधान केले होते. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार असल्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील

हे सुद्धा वाचा:- या लाडक्या बहिणींना मोदी सरकार देणार 6 हजार रुपये असा करा अर्ज

 

, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पात यावर विचार केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का हे स्पष्ट होईल.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली या निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसे देण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीआधी दिले होते. 1500 रुपये नियमित हप्ता दिला जात आहे मात्र महायुती सरकार घोषणा केल्याप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता कधी सुरु करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर असे 6 महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. यातील प्रत्येक महिन्याला 1500 असे मिळून एकत्रित 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांना या योजेनचा लाभ मिळाला आहे.दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या सरकारने जाहीर केलेल्या नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांना आता पैसे परत घेण्याची भीती आहे. पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी ‘योजना नको’असा अर्ज केला आहे. आपण या योजनेसाठी पात्र नाही, असं लक्षात आल्याने काही महिला अर्ज भरून योजनेचा लाभ नाकारत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रामाणिकसुद्धा आहेत, हे यातून सिद्ध होतंय”, असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.

 

Leave a Comment