सरकारचा मोठा निर्णय.! या नागरिकांना सरकार देणार 25000 रुपये January 14, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. सध्या अशा व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या बक्षिसापेक्षा ही रक्कम पाच पटीने अधिक आहे. नितीन गडकरींनी या नव्या धोरणाबद्दल बोलताना, सध्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जातं. मात्र अपघातानंतरच्या पहिल्या तासाभरात जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना अधिक बक्षिस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर पहिल्या सात दिवसांमध्ये जे उपचार केले जातील त्याचा खर्च सरकार करणार आहे. यासाठीही मर्यादा दीड लाखांपर्यंत असून दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. गडकरींनी या कार्यक्रमात बोलताना, “केवळ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्यांसाठी ही योजना नाही तर राज्य महामार्गांवर अपघातात जखमी झालेल्यांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे,” अशी माहिती दिली.