ई-हक्क प्रणाली आधारे नागरिकांना वारसा नोंद करता येईल. ई-फेरफार आधारे तलाठ्यांना हे काम करता येईल. pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना सहकारी संस्थांना अगोदर लॉगिन करावे लागेल. त्यासाठी अगोदर साईन-अप, नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा उतरवणे, इकरार नोंदी, मयताचे नावे कमी करणे इतर कामे करता येईल. ई-हक्क प्रणालीचा वापर करून आठ प्रकारच्या नोंदी घरबसल्या करता येतील.
त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. घरबसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. नागरिक स्वतः या प्रणाली आधारे अथवा महा ई-सेवा केंद्रातून अर्ज करू शकतात. या प्रणालीच्या वापराने तलाठ्याचे काम अधिक सोपे होईल. तर महसूल प्रशासनाच्या कामकाजामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता येईल.