मोफत आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांकडे आता एकच मार्ग शिल्लक आहे. UIDAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) यासंबंधी माहिती दिली आहे. त्यानुसार, मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन पोर्टलद्वारे डेमोग्राफिक माहिती अपडेट करता येईल, ज्यासाठी पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अशाप्रकारे, UIDAI ने स्पष्ट केले आहे की, आधारमधील अपडेट पुढील एक वर्षासाठी ऑनलाइन मोफत होईल, परंतु ऑनलाइन अपडेटमध्ये मर्यादित सुविधाच मिळतील

आजकाल प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जात आहे. कोणतेही सरकारी कागदपत्र बनवायचे असो, बँकेत खाते उघडायचे असो किंवा नवीन नोकरीसाठी कागदपत्रे द्यायची असोत, सर्वत्र आधार कार्ड मागितले जाते. हा १२ अंकी युनिक आयडेंटिटी क्रमांक आहे, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीची ओळख निश्चित केली जाते. नियमांनुसार, प्रत्येक व्यक्तींने त्याचे आधार कार्ड दर १० वर्षांनी अपडेट करणे आवश्यक आहे. बाल आधार म्हणजेच मुलांचे आधार ५ ते १५ वर्षांच्या दरम्यान अपडेट केले जाते. आधार अपडेटची अंतिम मुदत आज, १४ जून २०२५ रोजी संपत होती. ज्यामध्ये डेमोग्राफिक बदलाची सुविधा पुढील एक वर्षासाठी ऑनलाइन वाढवण्यात येत आहे.