अर्ज कसा करावा?
यूआयडीएआय इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, आपण [email protected] मेल करू शकता आणि आपला अर्ज पाठवू शकता. इंटर्नशिप करण्यासाठी तुमच्या कॉलेजची एनओसी असणं गरजेचं आहे.
यूआयडीएआयची ही इंटर्नशिप ६ आठवड्यांपासून १ वर्षापर्यंत असू शकते. त्याचबरोबर इंटर्नकडे लॅपटॉप असणंही आवश्यक आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२५ आहे. अशावेळी यासाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.