नवीन वर्षात या बॅंकेने दिली गुड न्यूज.! या बँकेचा होम लोनचा EMI होणार आता कमी पहा नवीन दर January 7, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेनं नवीन वर्षाच्या निमित्तानं देशातील ग्राहकांना एक खास भेट दिली आहे. बँकेनं होम लोन आणि कार लोनचा ईएमआय कमी करून मोठा दिलासा दिला आहे.एचडीएफसी बँकेनं एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉईंट्सची कपात केलीये. या कपातीनंतर एचडीएफसी बँकेचा एमसीएलआर आता ९.१५ ते ९.४५ टक्क्यांदरम्यान आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना संक्रातिला सरकार देणार ही मोठी गुड न्यूज सुधारित दर ७ जानेवारी २०२५ पासून लागू झाले आहेत. एमसीएलआर कमी झाल्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होतात, ज्यामुळे ईएमआय कमी होतो आणि कर्ज घेण्याचा खर्च कमी होतो. एमसीएलआर दरात कपात केल्यानं एमसीएलआरशी जोडलेल्या गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यवसाय कर्ज यासारख्या जुन्या फ्लोटिंग रेट लोनच्या ईएमआयवर थेट परिणाम होणार आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना संक्रातिला सरकार देणार ही मोठी गुड न्यूज एमसीएलआर दरात कपात केल्याने या कर्जावरील ईएमआयही कमी होईल.बँकेनं ओव्हरनाईट एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे, जी त्यानंतर हा दर ९.२० टक्क्यांवरून ९.१५ टक्के करण्यात आलाय. एका महिन्याच्या एमसीएलआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून व्याजदर ९.२० टक्केच राहणार आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर ९.३० टक्के ठेवण्यात आला आहे.सहा महिने आणि एक वर्षाच्या एमसीएलआरमध्ये ५ बीपीएसची कपात करण्यात आली असून तो आता ९.५० टक्क्यांवरून ९.४५ टक्के करण्यात आलाय. दोन वर्षांचा एमसीएलआर ९.४५ टक्क्यांवर कायम असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. तीन वर्षांचा एमसीएलआर ९.५० टक्क्यांवरून ९.४५ टक्के झाला आहे.