Insurance Scheme 2025:- नमस्कार मित्रांनो सरकार विविध उपयुक्त योजना राबवत असते. त्यापैकीच एक महत्त्वाची आणि विशेष योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ही योजना भारत सरकारद्वारे फक्त मुलींसाठी चालवली जाते. या योजनेचा लाभ मुलींना होत असून, २१ वर्षांनंतर एक मोठी रक्कम जमा होते.

जर आपली मुलगी १० वर्षांची असेल, तर आपण तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेत दरमहा काही रक्कम गुंतवू शकता. गुंतवणुकीसाठी आपण या योजनेत २५० रूपयांपासून सुरूवात करू शकतात.
हे सुद्धा वाचा:- मोफत रेशन सोबत मिळणार तुम्हाला आता एक हजार रुपये इथे बघा अर्ज प्रकिया
सुकन्या समृद्धी योजनेत आपल्याला सतत १५ वर्षे गुंतवणूक करावी लागते. तसेच ही योजना २१ वर्षानंतर परिपक्व होते जर या योजनेत दरमहा ५,००० रूपये देखील गुंतवले तर मुदतपूर्तीपर्यंत तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली रक्कम उभारू शकता. सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर ८ टक्के वार्षिक व्याज मिळते. जर, तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ५,००० रूपये गुंतवले तर तुमची वार्षिक गुंतवणूक ६०,००० होईल. अशा प्रकारे आपण १५ वर्षात एकूण ९,००,००० रूपये गुंतवाल.
हे सुद्धा वाचा:- मोफत रेशन सोबत मिळणार तुम्हाला आता एक हजार रुपये इथे बघा अर्ज प्रकिया
या दरम्यान, तुम्हाला १५ ते २१ वर्षांपर्यंत कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. तुम्ही गुंतवलेल्या या रकमेवर ८ टक्के व्याज मिळत राहील सुकन्या समृद्धी योजनेच्या कॅल्क्युलेटरनुसार, एकूण ९ लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर १७,९३,८१४ आपल्याला रूपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला एकूण २६,९३,८१४ रूपये म्हणजेच मॅच्युरिटीवर सुमारे २७ लाख रूपये मिळतील. जर, तुम्ही ही गुंतवणूक २०२५ साली सुरू केली तर आपल्या २०४६ पर्यंत मॅच्युरिटी रक्कम मिळेल. तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुमच्या गरजेनुसार ही रक्कम खर्च करू शकता.