नमस्कार मित्रांनो जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि मंदीमुळे गेल्या आठवड्यात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि दर वाढले.

संपूर्ण आठवड्यात शुद्ध सोन्याचे भाव २,९०० रुपये आणि प्रति किलो चांदी २,१०० रुपयांनी वाढली.३ टक्के जीएसटीसह शनिवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ९९,१८९ रुपयांवर पोहोचले.सोमवार, १९ मे रोजी सोने ३०० रुपयांनी वाढून ९३,७०० रुपयांवर पोहोचले.
हे सुद्धा वाचा आधार कार्डवर मिळवा दहा हजार रुपये कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
मंगळवारी ५०० रुपये आणि बुधवारी २०० रुपयांची वाढ होऊन भाव ९४,५०० रुपयांवर गेले. गुरुवार, २२ मे रोजी भाव १,७०० रुपयांनी वाढून ९६,२०० रुपयांवर पोहोचले. २३ रोजी सोने पुन्हा ४०० रुपयांनी वाढले. मात्र, २४ मे रोजी भाव ३०० रुपयांनी कमी होऊन ९३,४०० रुपयांवर स्थिरावले.
हे सुद्धा वाचा आधार कार्डवर मिळवा दहा हजार रुपये कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
शनिवारी ग्राहकांना ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम शुद्ध सोने ९९,१८९ रुपयांत खरेदी करावे लागले. दागिन्यांसाठी उपयोगात येणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचे भाव ३ टक्के जीएसटीसह ९२,२८८ रुपये होते. दुसरीकडे आठवड्यात चांदी २,१०० रुपये वाढीसह ९८,५०० रुपयांवर पोहोचली. ३ टक्के जीएसटीसह भाव १,०१,४५५ रुपयांवर गेले.