लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही , सरकारचा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांचे अर्ज तपासून त्यातील निकषाबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.सर्व महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करण्यास महिला व बालविकास विभागाने सांगितलं आहे.

 

हे सुद्धा वाचा: या दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे 1500 रुपये यादीत नाव बघा 

दरम्यान, यातही काही महिलांचे अर्ज हे तपासले जाणार नाहीत. त्यामुळे या महिलांना दिलासा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत गेल्या वर्षी २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यातील अनेक महिलांच्या अर्जांची पडताळणी करुन ते अर्ज बाद करण्यात आले आहेत. यात नियमांचे उल्लंघन करुन लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. दरम्यान, यातही काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत. पिवळे व केशऱी रेशनकार्डधारक असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी होणार नाही.केशरी व पिवळे रेशनधारक म्हणजे त्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. या महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची गरज नाही. अन्न धान्य पुरवठा विभागाने हे रेशन कार्ड दिलेले आहेत. त्यामुळे या महिलांच्या अर्जांची तपासणी करण्याची गरज नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता या महिलांना पैसे मिळणार आहेत.लाडक्या बहि‍णींना आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. एप्रिलचा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याची आज १६ तारीख आहे. अद्याप लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहेत.

Leave a Comment