शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सरकारी अनुदान May 1, 2025 by Liveyojana नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कृषी आणि इतर वैयक्तिक लाभांच्या योजनांतील देयके 12 मे 2025 पूर्वी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत .राज्य शासनाने सर्व संबंधित विभागांना याबाबत तातडीचे आदेश दिले असून, ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत हे वितरण करण्यात येणार आहे 28 एप्रिल ते 12 मे दरम्यान राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यात, Mahadbt पोर्टलवरील प्रलंबित अर्ज निपटारले जातील, हे सुद्धा वाचा:- एलपीजी सिलेंडर झाले इतक्या रुपयाने स्वस्त येथे बघा ताजे नवीन दर तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईसारख्या अनुदानांची रक्कम तातडीने खात्यात जमा केली जाईल.फेरफार नोंदी, मालमत्ता हस्तांतर प्रक्रिया, शिधापत्रिका वितरण यासारख्या सेवा देखील या काळात प्राधान्याने पूर्ण केल्या जाणार आहेत.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनासुद्धा (Birsa Munda Yojana) गतीमान करण्यात आली असून, अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी व इतर शेतीसंबंधित लाभ तत्काळ दिले जाणार आहेत.आजवर अनेक वेळा सूचना देऊनही अनेक लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले असून निधी जमा झालेला नाही. हे सुद्धा वाचा:- एलपीजी सिलेंडर झाले इतक्या रुपयाने स्वस्त येथे बघा ताजे नवीन दर त्यामुळे यावर्षी प्रत्येक विभागाला त्यांचा प्रगती अहवाल विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.या सेवा पंधरवड्यात निधी वितरण, अर्ज निपटारा आणि सेवा पूर्णता या तीन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यंत्रणांनी वेळेत काम पूर्ण करून अहवाल सादर करणे अनिवार्य राहणार आहे