सर्वसामान्यांसाठी मोठी माहिती.! आजपासून बदलणार हे 5 मोठे नियम तुमच्या खिशावर होणार हा परिणाम

नमस्कार मंडळी नवीन महिना आजपासून सुरु होत आहे. दर महिन्याप्रमाणे यंदाही देशात अनेक मोठे बदल होणार आहेत.

 

या नियमाचा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. १ मेपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती ते एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे.१ मे रोजी ऑइल मार्केट कंपन्या एलपीजी गॅसच्या किंमतीबाबतीत विचार करण्याची शक्यता आहे. १ मे रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

हे सुद्धा वाचा:- लाडका बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा सुरुवात येथे क्लिक करून बघा तुम्हाला मिळाले का पैस

मागील महिन्यात १९ किलो ग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलिंडर किंमतीत कपात करण्यात आली होती. तर सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचा दर वाढून सर्वसामान्यांना झटका दिला होता. १२ किलो ग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढवले होते. त्यामुळे आता १ मे रोजी सर्वसामान्यांचं एलपीजी सिलिंडरच्या किंमतीवर लक्ष असणार आहे. एलपीजी सिलिंडरसहित एअर टर्बाइन फ्यूलच्या दरात बदल केले जाणार आहेत. एटीएफच्या किंमतीत घट किंवा वाढ केल्यास त्याचा परिणाम हवाई यात्रा करण्याऱ्या प्रवाशांचा खिशावर होणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडका बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा सुरुवात येथे क्लिक करून बघा तुम्हाला मिळाले का पैस

 

१ मे रोजी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत बदल देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एटीएम मशीनमधून पैसे काढणे देखील महागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावावर फी वाढवण्यास मान्यता दिली आहे. १ मेपसासून ग्राहक होम बँकेच्या ऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. एका ट्रांजेक्शनवर १७ रुपयांऐवजी १९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून शिल्लक रक्कम तपासण्यावर ६ रुपयांऐवजी ७ रुपये आकारले जाणार आहे. अनेक बँकाच्या वेबसाईटवर फ्री-लिमिटनंतर ट्रांजेक्शन्सवर शुल्क आकारण्याविषयी माहिती देणे सुरु करुण्यात आलं आहे. यात एचडीएफसी, पीएनबी, इंडसइंड बँकेचा समावेश आहे. मे महिन्यात आणखी एक मोठा बदल होणार आहे. १ मेपासून देशातील ११ राज्यात ‘one state-one RRB’ योजना लागू होणार आहे. राज्यातील सर्व ग्रामीण बँकांना एकत्र जोडून एक मोठी बँक तयार करण्यात येणार आहे. यात सर्व बँकिंग सेवा मिळणार आहेत. ग्राहकांना आधीपेक्षा अधिक सेवा मिळणार आहेत. हा बदल उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसहित इतर राज्यात लागू होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment