पीएम किसान योजनेत मोठे बदल! ‘या’ शेतकऱ्यांना आता मिळणार नाही 6 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यात आली आहे

 

आता कोणताही शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अनिवार्य अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.योजनेत अर्ज करताना शेतकऱ्यांनी वैयक्तिक ओळखपत्र अपलोड करणे बंधनकारक केले आहे. तसेच, फॉर्ममध्ये वैवाहिक स्थितीचा तपशील आणि पती/पत्नी अथवा पालकांची माहिती भरणेही आता आवश्यक आहे

 

हे सुद्धा वाचा:- पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी घसरण येथे क्लिक करून ताजे तर बघा

शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन मालकीसंबंधित कागदपत्रे आणि जमाबंदी प्रत ऑनलाइन अपलोड करावी लागेल. या दस्तऐवजांची तहसील स्तरावर प्राथमिक तपासणी होईल आणि त्यानंतर जिल्हास्तरावर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला जाईल. यामुळे अपात्र अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता कमी होईल.PM-Kisan पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी आता आधारशी संलग्न मोबाईल नंबरवर मिळालेल्या OTP द्वारे प्रवेश करावा लागणार आहे. हा OTP केवळ 90 सेकंदांसाठी वैध असेल. त्यामुळे नोंदणी करताना अत्यंत काळजीपूर्वक माहिती भरावी लागणार आहे.जर नोंदणी करताना शेतकऱ्याने चुकीचे राज्य निवडले असेल, तर आता ‘शेतकरी कॉर्नर’ विभागातून ‘राज्य बदल विनंती’ करता येईल. ही विनंती तहसील आणि जिल्हास्तरावर तपासल्यानंतर भारत सरकारकडे पाठवली जाईल. यामुळे चुकीच्या नोंदणीमुळे होणारे गैरसमज दूर होतील.जर अर्ज करताना कोणतीही माहिती चुकीची आढळली किंवा शेतकरी अपात्र असल्याचे आढळले, तर त्यांचा अर्ज रद्द केला जाईल. तसेच, जर लाभ घेतला असेल तर ती रक्कम ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने वसूल केली जाईल.शेतकरी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक वापरून स्वतःच्या हप्त्यांची माहिती तपासू शकतात. वसुलीसाठी नेटबँकिंग, कार्ड्स, यूपीआय किंवा चेक/डिमांड ड्राफ्टद्वारे रक्कम भरता येईल.

हे सुद्धा वाचा:- पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी घसरण येथे क्लिक करून ताजे तर बघा

 

Leave a Comment