होम लोन घेणा-यांसाठी आनंदाची बातमी, या 2 सरकारी बँकांनी व्याजदरात केली कपात April 28, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो जर होम लोन किंवा कार घेयचं असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कॅनरा बँक आणि इंडियन बँक या दोन सरकारी बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे.ही कपात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एप्रिल 2025 च्या सुरुवातीला रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर लागू करण्यात आली आहे हे सुद्धा वाचा:- सरकार ने घेतला मोठा निर्णय 10 लाख घरकुल होणार मंजूर येथे बघा तुम्हला मिळेल का या निर्णयामुळे कॅनरा बँक आणि इंडियन बँकेकडून घेतलेले गृहकर्ज (होम लोन) आणि वाहन कर्ज (कार लोन) स्वस्त झाले आहेत, ज्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांसह जुन्या कर्जदारांच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) देखील कपात होणार आहे.एप्रिल 2025 च्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) बैठकीत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार रेपो रेट 6.25% वरून 6.00% इतका कमी झाला हे सुद्धा वाचा:- सरकार ने घेतला मोठा निर्णय 10 लाख घरकुल होणार मंजूर येथे बघा तुम्हला मिळेल का . रेपो रेट हा बँकांना RBI कडून अल्पकालीन कर्ज देण्यासाठी आकारला जाणारा व्याजदर आहे, आणि त्यात कपात झाल्याने बँकांचा निधी खर्च कमी होतो. परिणामी, बँका हा फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होतात आणि EMI कमी होण्यास मदत होते. या कपातीमुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून विशेषतः गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे.कॅनरा बँक आणि इंडियन बँक या दोन्ही सरकारी बँकांनी RBI च्या रेपो रेट कपातीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी त्वरित पावले उचलली आहेत. या बँकांनी आपल्या रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे, ज्यामुळे कर्जाचे व्याजदर कमी झाले आहेत. इंडियन बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बँकेने गृहकर्जावरील व्याजदर 8.15% वरून 7.90% इतके कमी केले आहेत. त्याचप्रमाणे, वाहन कर्जावरील व्याजदर 8.50% वरून 25 बेसिस पॉइंट्स कपात करून 8.25% इतके करण्यात आले आहे.