लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! अक्षय तृतीयेच्या दिवशी या लाडक्या बहिणींना मिळणार मोफत साडी April 27, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राबविण्यात येत आहे.होळी सणाच्या निमित्ताने हे साड्यांचे वाटप केले जाणार होते. मात्र, अद्यापही काही महिलांना साडी मिळालेली नाहीये. हे सुद्धा वाचा:- पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी घसरण येथे क्लिक करून ताजे दर बघा या महिलांना आता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साडी मिळणार आहे.कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते 27 जानेवारी रोजी झाला. या योजनेअंतर्गत राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिकाधारक यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण करण्यात येणार होते. मात्र, काही कारणास्तव काही भागात महिलांना साडी मिळालीच नाही.कॅप्टीव्ह मार्केट योजनेअंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र महिलांना अद्याप साडी मिळालेली नाहीये त्यांना अक्षय्य तृतीयेला साडी मिळणार आहे. हे सुद्धा वाचा:- पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी घसरण येथे क्लिक करून ताजे तर बघा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील महिलांना अद्याप साड्या मिळालेल्या नाहीयेत. दिंडोरी तालुय्कात 8 एप्रिल रोजी तर पेठ तालुक्यात 9 एप्रिल रोजी साड्या पोहोचल्या आहेत. सध्या स्वस्त धान्य दुकानांपर्यंत साड्या पोहोचवण्याचे काम सुरू असून लवकरच लाभार्थ्यांपर्यंत त्याचे वाटप करण्यात येईल अशी माहिती नायब तहसिलदार आणि तालुका पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांनी दिल्याचं वृत्त ‘सकाळ’ने दिलं आहे.ही योजना 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जवळपास 24 लाख 87 हजार 375 कुटुबांना होणार आहे.