मोठी बातमी.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार पुढील 48 तासात जोरदार गारपीट

Weather Update Maharashtraनमस्कार मित्रांनो गेल्या २४ तासांत देशाच्या विविध भागात वादळी वारे, काही ठिकाणी विजांसह पाऊस आणि गारपीट झाली आहे. महाराष्ट्रातही पहाटे अनेक ठिकाणी पाऊस पडला.तर काही जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांचा इशारा देण्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून, उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी (२६ एप्रिल) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

हे सुद्धा वाचा: कर्मचाऱ्यांना मिळणार दर महिन्याला तीन हजार रुपये येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा

गेल्या २४ तासांत विदर्भाला उष्णतेच्या लाटेने ग्रासले आहे. शुक्रवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले. विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.रविवारी (२७ एप्रिल) रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम,

हे सुद्धा वाचा: कर्मचाऱ्यांना मिळणार दर महिन्याला तीन हजार रुपये येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा

 

 

यवतमाळ, वर्धा, नागपूर, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.सोमवारी (२८ एप्रिल) नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. तसेच, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे

Leave a Comment