Farmers land ownersनमस्कार मित्रांनो सातबारावर मृत खातेदारांची नावे कायम असल्याने वारसांना अनेक अडचणी येत आहे. यासाठी जिवंत सातबाराची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आता शेतकऱ्यांना जमीन मालक (Farmers land owners) होण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होत आहे.यामध्ये तलाठ्यांद्वारा करण्यात आलेल्या गावनिहाय सर्व्हेत १० हजारांवर मृत शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी आता फेरफार प्रक्रिया सुरू झाल्याने मृतांच्या जागी वारसांची नावे चढणार आहेत शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ‘जिवंत’ सातबारा ही मोहीम राबविण्यात येत आहे
. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांद्वारा गावनिहाय सर्व्हे करण्यात आला या मोहिमेमुळे मृत खातेदारांच्या वारसाला फेरफारसाठी लागणारा वेळ व पैशाची बचत होत आहे. कमी अवधीत हक्काची शेतजमीन वारसाचे नावे होत असल्याने मोहीम कल्याणकारी ठरत आहे.वारस नोंदीसाठी दिरंगाई होत असल्याने मृत शेतकऱ्यांच्या नावे जमिनी व सातबारा राहतो. परिणामी, वारसांना मालकी हक्क मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकरणात जिवंत सातबारा मोहीम उपलब्धी ठरणारी असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.