सर्वप्रथम एनपीसीआय च्या वेबसाईटवर यायचं आहे. या ठिकाणी निळ्या रंगात काही पर्याय दाखवण्यात आले आहेत.
यापैकी दुसरा पर्याय Consumer नावाच्या पर्यायावर क्लिक करायच आहे.
या यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल नावाचा पर्यावर क्लिक करायचे आहे.
पुढील विंडोवर एंटर युअर आधार असा पर्याय दिसेल.
यामध्ये आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे.
त्याखाली कॅपच्या कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
आता आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल हा ओटीपी प्रविष्ट करायचा आहे.
ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
यानंतर आपल्यासमोर आपल्या बँकेची माहिती दिसून येईल.

जसे की आधार नंबर, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम आणि बँक खात्याचा प्रकार ही सगळी माहिती दिसून येईल.
आणि याच खात्यामध्ये आपल्या शासकीय योजनांचा अनुदान हे वितरित होत असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.