येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा
.आता 2025 मध्ये आणखी व्यापक आणि सक्षम बनली आहे. या योजनेतून आतापर्यंत 12 कोटींपेक्षा जास्त कनेक्शन्स देण्यात आले असून, गेल्या पाच वर्षांत सिलिंडर रिफिलची संख्या दुप्पट झाली आहे. चला, जाणून घेऊया नवीन नियम, पात्रता आणि लाभ कसा मिळवावा याबाबत सविस्तर माहिती.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश हा गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देणे आहे. 2016 मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत 12 कोटी कनेक्शन्स वितरित झाले असून, दरवर्षी सरासरी 4.5 सिलिंडर प्रति कुटुंब वापरले जात आहेत.सरकारच्या आकडेवारीनुसार, उज्ज्वला 2.0 (2021 मध्ये सुरू) अंतर्गत 1.6 कोटी अतिरिक्त कनेक्शन्स देण्याचे लक्ष्य गाठण्यात आले आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि गरीब कुटुंबांमधील महिलांना लक्ष्य करते, ज्यांचा पारंपरिक इंधनावर (लाकूड, कोळसा) अवलंबित कमी करून आरोग्य आणि पर्यावरणाला फायदा होईल.सरकारी योजनेनुसार, एका कुटुंबाला फक्त एकच कनेक्शन दिले जाते. याचा अर्थ असा की कुटुंबातील काही महिलेचे उज्ज्वला योजनेअंतर्गत आधीच कनेक्शन आहे आणि त्या कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला आहेत. मग अशा परिस्थितीत, इतर महिलांना लाभ मिळू शकणार नाही. पंरतू एकाच कुटुंबातील दोन महिला वेगवेगळ्या घरात राहतात. जर दोघांकडे वेगवेगळे रेशनकार्ड असतील आणि दोघेही त्यांच्या कुटुंबाचे वेगळे ओळखपत्र वापरत असतील तर अशा परिस्थितीत दोन्ही महिलांना लाभ मिळू शकतो. यासाठी, गॅस एजन्सी आणि तेल कंपन्यांकडून पडताळणी केली जाते.