RBI चे नवीन नियम होणार लागू १ मे पासून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी लागणारे इतके रुपये April 13, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात बदल केले जाणार आहेत. रिसर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे एटीएममधून व्यवहार करणं पूर्वीपेक्षा अधिक महाग होणार आहे. हे सुद्धा वाचा- लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिलमध्ये तीन हजार रुपये इथे बघा पात्र महिला कोणत्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात एंटरचेंज शुल्क १७ रूपयांवरून १९ रूपये करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मोफत असलेल्या मर्यादेनंतर अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. हा बदल १ मे २०२५ पासून लागू होणार असल्याची माहिती आहे.अनेकांना व्यवहारांबाबतची मोफत मर्यादा किती असते, हे सुद्धा वाचा- लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिलमध्ये तीन हजार रुपये इथे बघा पात्र महिला कोणत्या हे ठाऊक नसतं. त्यामुळे नकळत मर्यादा ओलांडतात आणि अनावश्यक शुल्क आकारले जातात. पैसे काढताना अधिकची रक्कम वजा होते. अशा प्रकारे अनभिज्ञेमुळे आपल्या खात्यातून कधी आणि किती रक्कम शुल्काच्या स्वरूपात जमा होतात हे कळूनही येत नाही.आरबीआयच्या नव्या नियमानुसार, १ मे २०२५ पासून एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार आर्थिक रोख काढणे, बॅलन्स चेक, मिनी स्टेटमेंट, यात बदल करण्यात आले आहेत.पूर्वी रोख काढल्यावर मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर २१ रुपये शुल्क आकारले जात होते. परंतु, आता नव्या नियमानुसार प्रत्येक व्यवहारावर २३ रुपये आकारले जाणार आहे.तसेच, बॅलन्स चेक किंवा मिनी स्टेटमेंट चेक करण्यासाठी आधी ६ रुपये शुल्क आकारले जात होते. पण आता वाढवून ७ रुपये आकारले जाणार आहे. यासह एटीएम इंटरचेंज फी १७ रुपयांवरून १९ रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.