पीएम उज्जवला योजनेसाठी पात्रता
महिला ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
महिलांचे वय १८ किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
अनुसूचित जाती किंवा जमातीतील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांनी पीएम आवास योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएम उज्जवला योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, केवायसी, बँक अकाउंट नंबर,बीपीएल प्रमाणपत्र आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला https://pmuy.gov.in/hi/ujjwala2.html या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर अप्लाय फॉर उज्वला कनेक्शनवर क्लिक करायचे आगे.
यानंतर तुम्ही गॅस एजन्सीचे नाव निवडायचे आहे. यानंतर Indane, Bharat Gas किंवा HP Gas पैकी ऑप्शन निवडायचा आहे.यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.
यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट घेऊन गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे. येथे तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.