मुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय घरकुल साठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार येथे बघा अर्ज प्रक्रिया

Valu Anudan Yojana 2025 नमस्कार मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (८ एप्रिल) राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली आहे

 

. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील आदी सदस्य उपस्थित होते.या बैठकीत राज्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

 

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण होणार करोडपती आजच या योजनेला अर्ज करा 

तसेच राज्यातील विकास कामाच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. यावेळी ९ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये राज्यभरातील घरकुलांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण होणार करोडपती आजच या योजनेला अर्ज करा 

 

तसेच राज्यातील शासकीय आयुर्वेद/होमिओपॅथी /युनानी /योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “आता राज्यात वाळू डेपो पद्धत बंद होणार आहे. आता लिलाव पद्धतीने वाळू विक्री होणार आहे, म्हणजे एका रेती घाटासाठी दोन वर्षांचा लिलाव करण्यात येईल. तसेच विभागात जेवढे उपविभाग आहेत ते एकत्र करून दोन वर्षांचा लिलाव करण्याची योजना आहे. तसेच खाडी पात्रासाठी ही मान्यता तीन वर्षांची असेल. तसेच जी घरकुलं आहेत त्या घरकुलांच्या कामासाठी आपण ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू देणार आहोत

Leave a Comment