अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, प्रथम तुम्हाला पीएम किसान वेबसाइट वर जावे लागेल. त्यानंतर होमपेजवर “New Farmer Registration” पर्यायावर क्लिक करा. हि प्रक्रिया झाल्यानंतर १२ अंकी आधार नंबर टाकावा लागेल. मोबाईल नंबर टाकून देखील ऑनलाइन अर्ज करू शकता. यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करा. हि माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट बटनावर क्लीक करा.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया साधी आणि सोपी आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचा फायदा मिळवता येईल.