क्रेडिट रिपोर्ट मोफत कसे डाउनलोड करावे?
सर्वप्रथम तुम्हाला मान्यताप्राप्त क्रेडिट ब्युरोच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. CIBIL, Equifax, CRIF High Mark आणि Experian हे देशातील काही प्रमुख क्रेडिट ब्युरो आहेत.
तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्यापूर्वी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर साइन अप करावे लागेल. यासाठी तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, पॅन किंवा आधार कार्ड सारखी माहिती द्यावी लागेल.
ऑथेंटिकेशनसाठी, जन्मतारीख, पत्ता, रोजगार तपशील, मागील नोकरीचा इतिहास आणि राजीनामा तपशील (विचारल्यास) यासारखी माहिती भरावी लागेल.
अंतिम पडताळणीसाठी, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि सुरक्षा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. एकदा ते प्रमाणित झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक क्रेडिट रिपोर्ट पाहायला मिळेल.
तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करू शकता.