लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता April 2, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) नेहमीच चर्चेत असते.लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत.आतापर्यंत महिलांना ९ हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही *हे सुद्धा वाचा आनंदाची बातमी आता नागरिकांना घरकुलाचा हफ्ता घरबसल्या मिळवता येणार .लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत. या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावे. महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात. महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी, असे निकष आहेत.या सर्व निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.ज्या महिला या निकषात बसत नाही तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आतापर्यंत ९ लाख महिलांना योजनेतून बाद केले आहेत. मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेत त्यांना पैसे मिळणार नाहीत.लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही. त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.