आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार यादीत आपले नाव आहे का तपासा March 29, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून 2 हजार रुपये जमा होणार आहे .नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सहाव्या हप्त्यांतर्गत आजपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार असून ₹2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणार जमिनींवर तारण कर्ज येथे बघा अर्जप्रकिया . अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहावा हप्ता निधी वितरणासंबंधी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर, 2023रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला होता. हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणार जमिनींवर तारण कर्ज येथे बघा अर्जप्रकिया