नमो शेतकरी सन्मान योजने’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित हप्त्यांचे वितरण करण्यात येते. आतापर्यंत पाच हप्त्यांचे वाटप पूर्ण झाले असून, सहाव्या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी आता मंजूर झाल्याने लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तपासावीत आणि लवकरच मिळणाऱ्या हप्त्यासाठी तयार राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राज्यातील लाखो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत घेत आहेत. यंदा हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे अनेक भागातील शेती मोठ्या अडचणींना सामोरी गेली आहे. त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.