शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी आवश्यक पाणी स्रोत असणे आवश्यक आहे.
शेततळे, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही वाहणाऱ्या नदी/नाल्याच्या जवळील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.
संबंधित क्षेत्रात शाश्वत पाणी उपलब्ध असल्याचे महावितरणद्वारे पडताळले जाईल.
‘अटल सौर कृषी पंप योजना-1 व 2’ किंवा ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना’चा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
‘SOLAR MTSKPY’ पोर्टलला भेट द्या.
‘सुविधा’ टॅबवर क्लिक करून नवीन अर्ज भरा.
वैयक्तिक माहिती, पत्ता, शेती व बँक तपशील भरा.
अर्ज सबमिट केल्यानंतर पोहोच पावती मिळेल.
कोणत्याही अडचणीसाठी तालुका महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
सौर कृषी पंप योजनेचे फायदे
विजेच्या खर्चात बचत
दिवसा शेताला पाणी उपलब्ध
शाश्वत सिंचनाची सुविधा
केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत
डिझेल व विजेच्या तुलनेत कमी खर्च
राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरत असून, सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.