1 एप्रिल पासून बदलणार बँकेचे नवीन नियम जाणून घ्या अन्यथा होणाऱ हे मोठे नुकसान

नमस्कार मित्रांनो १ एप्रिल २०२५ पासून देशभरातील बँकिंगचे नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम दैनंदिन व्यवहार करताना होणार आहे. बँकांचे नियम बदलल्याने सेव्हिंग अकाउंट, क्रेडिट कार्ड आणि एटीएम ट्रांजॅक्शन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत असे म्हटले जात आहे.

 

हे सुद्धा वाचा:- बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देणार 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज 

 

बँकेच्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत? जाणून घेऊयात…भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याची मंजूरी दिली आहे. यामुळे हॉम बँक नेटवर्कच्या बाहेरील एखाद्या एटीएममधून पैसे काढणे किंवा खात्यातील शिल्लक तपासणे पूर्वीपेक्षा खर्चिक होईल. आधी एटीएममधून पैसे काढताना १७ रुपये फी होती. आता फी म्हणून १९ रुपये घेतले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा:- बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देणार 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज 

 

एटीएममध्ये बॅलेन्स चेक करताना आधी ६ रुपये लागायचे, आता ७ रुपये द्यावे लागणार आहेत. डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी बँका नवनवीन फीचर्स जोडत आहेत. आता ऑनलाइन बँकिंगद्वारे ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सेवा मिळू शकेल. एआयवर आधारित चॅटबॉट्सचा वापर बँकामध्ये केला जाणार आहे. डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यासारखी सुरक्षा सुरु केली जाणार आहे. एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक अशा काही बँकांमध्ये मिनिमम बॅलेन्सशी संबंधित नियम बदलले जाणार आहेत. तुमचे बँकेतील खाते शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण यांपैकी कोणत्या ठिकाणी आहे, यावरुन मिनिमम बॅलेन्सचे नियम ठरवले जातील. याशिवाय निर्धारित रकमेपेक्षा कमी बॅलेन्स असल्यावर वापरकर्त्यांना दंड भरावा लागेल.१ एप्रिलपासून अनेक बँका सेव्हिंग अकाउंट आणि एफडीवरच्या व्याजदरात बदल करणार आहेत. एप्रिल २०२५ पासून सेव्हिंग अकाउंटवरील व्याज खात्यातील शिल्लक रकमेवर (मिनिमम बॅलेन्स) अवलंबून असेल. थोडक्यात जितका मिनिमम बॅलेन्स असेल, तितका रिटर्न तुम्हाला मिळेल.

Leave a Comment