नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in यावर जाऊन अर्ज करु शकतात.

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.फॅकल्टी पदासाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ऑफिस असिस्टंट पदासाठी २२ ते ४० वयोगटातील तर अटेंडर, सब स्टाफ पदासाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात

सेंट्रल बँकेतील या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. फॅकल्टी पदासाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी १२,००० रुपये तर अटेंडर पदासाठी ८००० रुपये पगार मिळणार आहे. वॉचमन कम गार्डनर पदासाठी ८००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. याबाबत अंतिम निर्णय समिती घेणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरावा. हा अर्ज क्षेत्रीय प्रबंधक/अध्यक्ष, LAC सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, पहिला मजला, पटेल चौक, HPO जवळ, सीवान, पिन कोड- ८४११२२६ येथे अर्ज पाठवायचा आहे.