तुमचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला मतदार सेवा पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यानंतर पुढे देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करा.

सर्वप्रथम मतदार सेवा पोर्टलला भेट द्या आणि ‘फॉर्म’ पर्यायावर क्लिक करा.जर तुम्ही नोंदणीकृत असाल, तर तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘लॉगिन’ वर क्लिक करा.

जर तुम्ही नोंदणीकृत नसाल, तर ‘साइनअप’ पर्यायावर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा. तुमचा मोबाइल नंबर, कॅप्चा कोड भरा आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा. ओटीपी, तुमचा ईपीआयसी क्रमांक, पासवर्ड यासारखे आवश्यक तपशील भरा आणि ‘नोंदणी करा’ बटणावर क्लिक करा.

नोंदणी केल्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड भरुन करून लॉग इन करा. ‘फॉर्म ६बी’ वर क्लिक करा. राज्य आणि तुमचा विधानसभा/संसदीय मतदारसंघ निवडा.

तुमची वैयक्तिक माहिती एंटर करा, ओटीपी, आधार क्रमांक एंटर करा आणि ‘प्रिव्ह्यू’ बटणावर क्लिक करा.

‘सबमिट’ वर क्लिक करा. तुमचा अर्ज ट्रॅक करण्यासाठी एक संदर्भ क्रमांक दिला जाईल.