योजनेत तीन कॅटेगरीत लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन दिले जातात. यात शिशु लोनमध्ये ५० हजार रुपये दिले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीची गरज नाही. त्यानंतर ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. तुम्ही हे लोन फेडल्यानंतरच तुम्हाला २० लाखांचे लोन मिळणार आहे.

या योजनेत लहान दुकानदार, फळ, फूड प्रोसेसिंग यांसारखे उद्योग सुरु करु शकतात. यासाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा. त्यांची बँकेत कोणतीही डिफॉल्ट हिस्ट्री नसावी. त्यानंतर बँकेत अकाउंटदेखील असायला हवे.